गुवाहाटी - डिसेंबर महिन्यामध्ये चिनी सैन्याच्या एका पथकाने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून रस्ता बांधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी विरोध गेल्यानंतर चीनी सैन्य माघारी परतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सीयांग जिल्ह्यातील ट्युटिंग भागामधील बिशिंग गावात चीनी सैन्याने केलेली घुसखोरी एका स्थानिक तरुणाच्या जागरुकतेमुळे वेळी उघडकीस आली होती.इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या चौक्यांवर सामान पोहोचवण्याचे काम करणाऱ्या जॉन नामक स्थानिक तरुणाने चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी पहिल्यांदा पाहिली. रोजच्या कामात गुंतलेला असताना त्याला चिनी सैन्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती लष्कराला दिली. त्यामुळे तातडीने कारवाई करून चिनी सैन्याला हुसकावून लावणे शक्य झाले. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या चौक्यांवर सामान पोहोचवण्याचे काम करणाऱ्या जॉन नामक स्थानिक तरुणाने चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी पहिल्यांदा पाहिली. रोजच्या कामात गुंतलेला असताना त्याला चिनी सैन्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती भारतीय लष्कराला दिली. त्यामुळे तातडीने कारवाई करून चिनी सैन्याला हुसकावून लावणे शक्य झाले.
चीनने रस्ता बांधण्यासाठी यंत्रसामुग्री पाठवलेले ठिकाण दुर्गम भागात आहे. तसेच सुमारे चार हजार फूट उंचावर वसलेले आहे. बिशिंगमधून येथे पोहोचण्यासाठी सुमारे ८ ते दहा दिवस लागतात. आतापर्यंत आम्ही हा भाग नो मॅन्स लँड आहे, असे समजत होतो. कारण सीमा निश्चित करण्यासाठी तेथे कुठलीही भौगोलिक खूण नाही. हल्लीच गुगल मॅपवर पाहिल्यावर आम्हाला हा आपला भाग असल्याची जाणीव झाली. दरम्यान विरोध करण्यापूर्वी चीनने या भागात सुमारे सव्वा किलोमीटर लांबीचा रस्ता बनवला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. चिनी सैनिकांच्या अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीचा प्रश्न सोडवण्यात आला आहे, अशी माहिती लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सोमवारी दिली होती. त्यावेळी डोकलाममधील चिनी सैनिकांच्या उपस्थितीमध्येही घट झाल्याचा दावा बिपिन रावत यांनी केला होता. भारताचे ईशान्येकडील राज्य असलेला अरुणाचल प्रदेश हा आपला भाग असल्याचा दावा चीनकडून नेहमीच करण्यात येतो. चिनी सैनिकांनी डिसेंबरअखेर रस्ते उभारण्याच्या यंत्रसामुग्रीसह अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील गावापर्यंत मजल मारली होती. तिथे ते रस्ता बांधण्यासाठीचे सामान घेऊन आले होते. मात्र सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना वेळीच रोखले. चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याच्या वृत्तास सुरक्षा संस्थेतील लोकांनी दुजोरा दिला आहे. जवळपास ८ ते १० दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मात्र तो आता उघडकीस आला होता. भारतीय जवानांनी वेळीच त्यांना रोखल्याने चिनी सैनिक सोबत आणलेली यंत्रसामुग्री तेथेच सोडून माघारी फिरले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते