ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - चीनने पुन्हा एकदा भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तराखंडच्या चमेली जिल्ह्यात चीन सेनाने घुसखोरी केल्ययाची माहीती मुख्यामंत्री हरीश रावत यांनी आज दिली. रावत म्हणाले की, राज्यातील महसूल अधिकाऱ्यांनी चमेली जिल्ह्यात चीन सेनेच्या हालचाली पाहिल्या आहेत. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलतं होते. एएऩआय या न्युज वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांना चीन घुसखोरी या विषयावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले. हे चिंताजनक आहे, आम्ही सुरुवातीला याचे निरीक्षण केले. चीनी सैनिकांनी घुसखोरी केल्याची माहीती बरोबर आहे. ज्या ठिकाणी चीनी सैन्याने घुसखोरी केल्याचे आढळून आले तेथिल सुरक्षा अधिक वाढवण्यची गरज आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, याबाब केंद्र सरकार आणि सुरक्षा संस्थेलाही याची माहीती आहे. आता जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही करु.
दरम्यान, चीनने याअगोदरही भारतामध्ये अनेकवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे पुरावेही वारंवार भारताने सादर केले आहेत. मात्र चीनने अद्यापही घुसखोरी रोखलेली नाही आहे. 9 जूनला कामेंगच्या पुर्वेकडे चीनच्या गस्त विभागाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. विेशेष म्हणजे भारताला अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यावरुन चीन विरोध करत असताना अगोदरच दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे, आणि त्याचवेळी चीनकडून ही घुसखोरी झाली आहे. चीनने यावर्षी घुसखोरी करण्याची ही दुसरी घटना आहे. यापुर्वी, 9 जून रोजी त्यांनी घुसखोरी केली होती.