नवी दिल्ली : मागील चार वर्षांत चीनने भारतातील १६०० पेक्षा जास्त कंपन्यांत १ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त गुंतवणूक केली आहे. भारत सरकारने राज्यसभेत ही माहिती दिली.एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली. या माहितीनुसार, एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या काळात चीनमधून १.०२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक भारतातील १६०० कंपन्यांत करण्यात आली. यातील बहुतांश गुंतवणूक स्टार्ट-अप कंपन्यांत झाली आहे. चीनमधून गुंतवणूक मिळवणाऱ्या या कंपन्या ४६ क्षेत्रांतील आहेत. यात वाहन उद्योग, पुस्तक छपाई (लिथो प्रिंटिंग उद्योगासह), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा क्षेत्र आणि इलेक्ट्रिकल उपकरणे या क्षेत्रांना प्रत्येकी १०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक मिळाली.वाहन उद्योगास सर्वाधिक १७२ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक मिळाली. सेवा क्षेत्राला १३९.६५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक मिळाली. अर्थ राज्यमंत्री ठाकूर यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, चीनच्या गुंतवणुकीची माहिती मंत्रालय ठेवत नाही.
१,६०० भारतीय कंपन्यांत चीनची मोठी गुंतवणूक; केंद्र सरकारची राज्यसभेत अधिकृत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 7:17 AM