ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे. चिडलेल्या चीननं भारताला धमकावण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्करानं सिक्कीम सीमेवरून लष्कर न हटवल्यास त्यांना आम्ही हुसकावून लावू, असा धमकीवजा इशाराच चीननं भारताला दिला आहे. चीनचं सरकारी वृत्त ग्लोबल टाइम्समधून छापून आलेल्या लेखातून अशी धमकी देण्यात आली आहे. युद्ध झाल्यास भारताला 1962पेक्षा अधिक गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही चीननं म्हटलं आहे. जर भारतानं सिक्कीम सीमेवर त्यांच्या भागातून लष्कर हटवलं नाही, तर आम्ही त्यांना हुसकावून लावू, असंही चीन म्हणाला आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखातून ही टिपण्णी करण्यात आली आहे. भारतीय लष्कर सन्मानासहीत सिक्कीम सीमेवरून मागे हटू शकते, अन्यथा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक त्यांनी हुसकावून लावतील, असंही लेखात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या डोंगलांग भागातून भारतीय लष्कर मागे हटल्यास दोन्ही देशांतील तणाव निवळेल, लेखात भारताविरोधात वादग्रस्त भाषेचा वापर करण्यात आला आहे. भारतानं 21व्या शतकातल्या सभ्यतेचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सीमेवर आगळिकीवरून विधान जारी केलं आहे. त्यातही भारताला सिक्कीम भागातून मागे हटण्याची सूचना करण्यात आली आहे.
(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)