नवी दिल्ली : लडाखमधील हॉट स्प्रिंगपासून चीन आणि भारताच्या सैन्यांने माघार घेतली आहे. डिसएंगेजमेंटच्या प्रक्रियेअंतर्गत दोन्ही देशांच्या सैन्यांने माघार घेतली आहे. तसेच, पँगोंगसंदर्भात पुढील आठवड्यात लष्कराची कमांडर स्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
लष्कर आणि राजनैतिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेमुळे संवादामुळे पीपी 15 वर संपूर्ण डिसएंगेजमेंट झाले आहे. यापूर्वी, गलवान आणि गोगरा भागांमध्येही डिसएंगेजमेंट प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. म्हणजेच, पूर्व लडाखच्या पीपी 15, पीपी 14 आणि पीपी 17 ए मध्ये डिसएंगेजमेंट झाले आहे.
पँगोंग आणि हॉट स्प्रिंग असे क्षेत्र आहेत, जेथे दोन्ही देशाचे सैन्य समोरासमोर आले आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता भारतीय सैन्यही पूर्णपणे सतर्क आहे. परंतु आता दोन्ही देशांनी आपले सैन्य हॉट स्प्रिंगमधून मागे घेतले आहे. मात्र, पुढील आठवड्यात पँगोंगसंदर्भात चर्चा होऊ शकते.
दोन्ही देशांमध्ये मेच्या सुरुवातीपासूनच तणाव आहे. हा तणाव संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यांने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये निर्णय घेण्यात आला की, दोन्ही सैन्यांने कोणत्याही वादग्रस्त भागातून माघार घ्यावी. 14 जुलै रोजी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शेवटची चर्चा झाली होती. चीनचे कोर कमांडरच्या बैठकीनंतरच चीनने हॉट स्प्रिंगमधून माघार घेण्याचे संकेत दिले होते. पण पँगोंगमधून माघार घेतली नाही. चीनचे फिंगर 4 आणि 5 परिसरात थांबण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान, १५ जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचेही सैनिक मारले गेले होते. मात्र, चीनने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला. आता दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
आणखी बातम्या....
या सरकारचं भवितव्य विरोधी पक्षनेत्यांवर अवलंबून नाही; उद्धव ठाकरेंनी पुन्हा सुनावलं
शरद पवार म्हणाले, 'रिमोट कंट्रोल नाही, संवाद हवा'; उद्धव ठाकरे म्हणाले...
'अनलॉक -३' मध्ये सिनेमा हॉल उघडण्याची शक्यता, माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रस्ताव