शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

Chinese Apps Banned: भारताची चीनवर डिजिटल स्ट्राइक; तातडीने बॅन केले 232 लोन आणि बेटिंग अॅप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 2:20 PM

Chinese Apps Banned: भारत सरकारने चीनी कनेक्शन असलेल्या लोन आणि बेटिंग अॅप्सवर बंदी घातली आहे.

App Ban : भारत सरकारने चीनी कनेक्शन असलेल्या लोन आणि बेटिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या अॅप्सवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने बंदी घातलेल्या अॅप्समध्ये 138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन अॅप्स आहेत. या अॅप्समुळे भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका होता.

चीनशी संबंधया अॅप्सचा चीनशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, या अॅप्सना आपत्कालीन आणि तातडीने ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूण 232 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. आयटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याची माहिती दिली होती. त्यानंतर या अॅप्सवर कारवाई करण्यात आली. 

थर्ट पार्टी वेबसाइटवर उपलब्ध स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी बहुतेक अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत, पण थर्ड पार्टी लिंक किंवा वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. अनेक अॅप्स थेट सोशल मीडिया साइटवरून ऑनलाइन देखील प्ले केले जाऊ शकतात. यापैकी अनेक अॅप्स क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट स्वीकारतात. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयने म्हटले की, भारतातील बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहे. याची जाहिरात करण्यावरही ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टीव्ही नेटवर्क नियमन कायदा 1995 आणि आयटी नियम 2021 अंतर्गत बंदी आहे. मंत्रालयाने ऑनलाइन जाहिरात कंपन्यांनाही भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिराती न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक लोकांची आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक स्थिती बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारtechnologyतंत्रज्ञान