नवी दिल्ली : भारत आणि चीननेडोकलाममधील संघर्ष संपल्याची घोषणा झाल्यानंतरही चीनचे सैन्य तिथे असल्याच्या बातम्या सतत येतात. तिथे रस्ते बांधण्याचे काम चीन करीत असल्यापासून चिनी सैनिक दिसल्याचे वृत्त प्रसिद्ध होत असते. पण डोकलाम वाद संपल्यानंतर माजी विदेश सचिव एस. जयशंकर यांनी संसदीय समितीला उत्तर डोकलाममध्ये अजूनही चिनी सैन्य असू शकते, मात्र चीनच्या हद्दीत आहे की, भूतानच्या ही माहिती आपल्याकडे नाही, असे म्हटले होते.सध्याचे सचिव विजय गोखले यांनीही ही बाब नंतर मान्य केली होती. गोखले यांनी समितीला सांगितले की, भूतान व चीन यांतील वादग्रस्त भागात चीनने सैन्य उभारणी केली आहे. हा भाग भारत-चीन सीमेपाशी आहे. यंदा २२ फेब्रुवारी रोजी गोखले यांनी समितीला सांगितले की, भूतान व चीनचा वाद असलेल्या भूमीत चिनी सैन्य आहे. भारत व चीन सीमेवरही दोन्ही बाजूंनी सैन्याची जमवाजमव सुरू आहे.
डोकलाममध्ये चिनी सैन्य अद्याप कायम?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 5:21 AM