श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी प्रथमच चीनचे झेंडे फडकवण्यात आले. काल दुपारचा नमाज आटोपल्यानंतर बारामुल्ला परिसरात आंदोलनकर्त्यांनी चीनचे झेंडे फडकवल्याचे फडकावल्याने ही बाब पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा तसेच केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात अनेकदा पाकिस्तानचे झेंडे फडकावले जातात. त्याची स्थानिक रहिवासी व पोलिसांनाही सवय झाली आहे मात्र चीनचे झेंडे प्रथमच फडकावण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनाही आश्चर्य वाटले. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराला वाटत आहे. श्रीनगरमध्ये शुक्रवारी नमाज संपल्यानंतर काही जणांनी नेहमीप्रमाणे घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी काही जणांनी चीनचा झेंडा हातात घेत, आम्हाला चीनकडून मदत हवी आहे, अशी घोषणाबाजी सुरू केली. जवळपास पाच ते सहा आंदालकांकडे चीनचे झेंडे दिसत होते. अर्थातच या आंदोलकांनी आपले चेहरे झाकून घेतले होते. पाकिस्तानचे झेंडे फडकावणारे निदर्शनही नेहमी याच पद्धतीने चेहरे झाकून घेत असतात. या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अश्रुधूराचा वापर करत निदर्शकांना पांगवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेसाठी शनिवारी गोव्यात दाखल झाले. ते भारतात येणार असतानाच, काश्मीर खेऱ्यात चीनचे झेंडे फडकावले गेल्याने यामागे चीनमधील काही गट आहेत की काय, अशी शंका घेण्यात येत आहे. मात्र हे चीनचे झेंडे पाकिस्तानमधूनच आले किंवा आणले असावेत, असे सांगण्यात येत आहे (वृत्तसंस्था)चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेसाठी येत असतानाच हा प्रकार घडला. दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहानी वणीचा खात्मा केल्यापासून काश्मीर खोरे धुमसत आहे. हिंसाचारामुळे अनेकांचा बळी गेला आहे आणि हजारो जखमी झाले आहे. या काळात अनेकदा पाकिस्तानी झेंडे फडकावण्यात आले होते. संचारबंदी उठवली; प्रीपेड मोबाइल सुरूचीनचे झेंडे फडकावल्याच्या पार्श्वभूमीवर खोऱ्यात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र तसे घडले नाही आणि रहिवाशांनीही या आंदोलकांना साथ दिली नाही. त्यामुळे श्रीनगरमधील परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी शनिवारी उठवण्यात आली. मात्र अनेक भागांमध्ये जमावबंदी लागू आहे. तीन महिन्यांपासून बंद केलेली प्रीपेड फोनची कॉल सुविधादेखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र मोबाइल इंटरनेट सेवा अद्यापही ठप्प आहे. काश्मीरममधील सामान्य जीवन विस्कळीत होऊन ९९ दिवस झाले आहेत. रविवारी १00 दिवस पूर्ण होतील.
काश्मीर खोऱ्यामध्ये प्रथमच फडकले चीनचे झेंडे
By admin | Published: October 16, 2016 12:59 AM