पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे महाबलीपूरममध्ये स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दोन दिवसांची शिखर परिषद होणार असून या परिषदेमध्ये अनौपचारिक स्वरुपाची चर्चा होणार असून या परिषदेसाठी भारताकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
भारताकडून या परिषदेच्या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सहभागी होणार आहेत. तर चीनकडून जिनपिंग यांच्यासोबत १०० जणांचे शिष्टमंडळही आले आहे. यामध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही अनौपचारिक स्वरुपाची चर्चा असणार आहे. त्यामुळे कोणताही करार या बैठकीअंती होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.