शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पित्याच्याच ट्रॅक्टरखाली चिरडली चिमुरडी!

By admin | Published: March 02, 2016 2:21 AM

औरंगाबाद : घाईगर्दीत घराबाहेर निघालेल्या एका पित्याच्या ट्रॅक्टरखाली त्याची चिमुरडी मुलगी आल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजनगरमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. हिरकणा योगेश जाधव (४) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. योगेश जाधव हे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. महापालिकेच्या पॉइंटवरून ट्रॅक्टरला जोडलेले पाण्याचे टँकर भरून आणायचे ...


औरंगाबाद : घाईगर्दीत घराबाहेर निघालेल्या एका पित्याच्या ट्रॅक्टरखाली त्याची चिमुरडी मुलगी आल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजनगरमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
हिरकणा योगेश जाधव (४) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. योगेश जाधव हे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. महापालिकेच्या पॉइंटवरून ट्रॅक्टरला जोडलेले पाण्याचे टँकर भरून आणायचे काम त्यांच्याकडे असते. मंगळवारी सकाळी ते पाण्याने भरलेला टँकर घरी घेऊन आले. जेवण करून ते पुन्हा टँकर घेऊन जाणार होते. जेवण झाल्याबरोबर त्यांना फोन आला. त्यामुळे ते तात्काळ घाईत निघाले. पण लाडकी लेक हिरकणा त्यांच्या पाठीमागे लागली. तिला घेऊन जाणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी तिला घरात नेऊन सोडले. आता ती येणार नाही, असे समजून त्यांनी घाईतच ट्रॅक्टर सुरू केला. मात्र हिरकणा त्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहिली होती. योगेश यांनी जसा ट्रॅक्टर मागे घेतला, तशी हिरकणा चाकाखाली चिरडली गेली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)