शहरं
Join us  
Trending Stories
1
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
2
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
3
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
4
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
5
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
7
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
8
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
9
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
10
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
11
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
12
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
13
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
14
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
15
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
16
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
17
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
18
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
19
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
20
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ

चिराग पासवान यांचा भाजपला घरचा आहेर; राहुल-अखिलेश यांच्या मागणीला समर्थन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 7:22 PM

Chirag Paswan on Caste Census : चिराग पासवान यांच्या मागणीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Chirag Paswan on Caste Census : देशात गेल्या काही काळापासून जात जनगणनेचा मुद्द्याने जोर पकडला आहे. विरोधक सातत्याने जात जनगणनेची मागणी करत आहेत. अशातच, केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनीदेखील जात जनगणनेची मागणी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून जात जनगणनेची मागणी करत आहेत. त्यांनी अनेकदा यावरुन भाजपवर टीका केली आहे. आता भाजपसोबत असलेल्या चिराग पासवान यांनीदेखील हीच मागणी केली आहे. म्हणजेच,  त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल आणि अखिलेश यांच्या मागणीला समर्थन दिले आहे.

लोजपा (रामविलास) च्या कार्यकारिणीची बैठकलोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी रांचीमध्ये बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जात जनगणनेच्या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट करताना चिराग पासवान म्हणाले की, "माझ्या पक्षाने जात जणगणनेच्या समर्थनार्थ आपली भूमिका नेहमीच स्पष्ट ठेवली आहे. जात जनगणना व्हावी, अशी आमची इच्छा आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना राबवतात, त्यामुळे योग्य व्यक्तीला त्याचा फायदा मिळण्यासाठी आणि त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडे ही माहिती असणे आवश्यक आहे."

यापूर्वीही अनेक मुद्द्यांवर वेगळी मते मांडली चिराग पासवान यांनी यापूर्वीही जात जनगणनेबाबत असेच मत व्यक्त केले आहे. किंबहुना केवळ जातगणनेलाच नव्हे, तर इतर अनेक बाबी आणि मुद्द्यांवर त्यांनी भाजपच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. अलीकडेच चिराग पासवान यांनी केंद्र सरकारच्या लॅटरल एंट्रीविरोधात वक्तव्य केले होते. याबाबत विरोधी पक्षांनी आधीच सरकारला धारेवर धरले होते, परिणामी केंद्र सरकारने ही भरती प्रक्रिया मागे घेतली. 

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानRahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवNarendra Modiनरेंद्र मोदी