शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

दत्तक मुलांची निवड बंद; एकच मूल देऊ करणार

By admin | Published: May 01, 2017 4:55 AM

मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे दत्तक घ्यायच्या मुलाची निवड करता येणार नाही. दत्तक प्रक्रियेचे समन्वय करणाऱ्या केंद्र सरकारच्या

नवी दिल्ली : मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे दत्तक घ्यायच्या मुलाची निवड करता येणार नाही. दत्तक प्रक्रियेचे समन्वय करणाऱ्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संस्थेतर्फे प्रत्येक इच्छुकास फक्त एकच मूल दत्तक घेण्यासाठी देऊ केले जाईल व ते मूल स्वीकारणे किंवा नाकारणे एवढाच पर्याय इच्छुकास उपलब्ध असेल. हा नवा नियम रविवार १ मेपासून लागू होईल.मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना  सरकारच्या दत्तकविषयक पोर्टवर नोंदणी करावी लागते. अशा नोंदणीकृत इच्छुक पालकांना आत्तापर्यंत दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन मुलांचा पर्याय दिसा जायचा व त्यापैकी एक मूल त्यांना निवडता येत असे. ही प्रथा १ मेपासून बंद होईल व पालकांना प्रत्येकी फक्त एकच मूल देऊ केले जाईल.या नव्या नियमामागील भूमिका स्पष्ट करताना ‘चाईल्ड अ‍ॅडॉप्शन रीसोर्स अ‍ॅथॉरिटी’ (कारा)चे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्ट. कर्नल दीपक कुमार म्हणाले की, आधीच्या पद्धतीत दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेली मुले प्रत्यक्ष दत्तक घेतली जायच्या आधी प्रदीर्घ काळ पालकांनी पसंत करण्याच्या चक्रात राहायची. त्यामुळे दत्तकाचे प्रमाण कमी होते. आता नव्या नियमानुसार जेवढी मुले दत्तक देण्यासाठी ‘अ‍ॅडॉप्शन पूल’मध्ये उपलब्ध असतील तेवढी मुले प्रत्येकी एक या प्रमाणात तेवढ्याच पालकांना देऊ केली जातील.मागणी जास्त, मुले कमीमागणी जास्त व मुले कमी हीसुद्धा ‘कारा’पुढील एक अडचण आहे. ताज्या माहितीनुसार दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या १५ हजार पालकांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे व त्यांना देऊ करण्यासाठी ‘अ‍ॅडॉप्शन पूल’मध्ये १८०० ते २००० एवढीच मुले उपलब्ध आहेत.नियम निसर्गाशी सुसंगतदाम्पत्यास निसर्गधर्मानुसार जेव्हा स्वत:चे मूल होते तेव्हा त्यांना मूल असेच व्हावे असा पर्याय नसतो. नशिबाने पोटी जन्माला येणारे मूल कसेही असले तरी आई-वडिलांसाठी ते नापसंत कधीच नसते. त्यामुळे दत्तक घेतलेल्या मुलाचाही याच भावनेने स्वीकार करून सांभाळ केला जावा, या या नियमाचा उद्देशही योग्यच आहे. दत्तक दिले जाणारे मूल ही जणू काही एखादी वस्तू आहे अशा प्रकारे पसंती, नापसंतीनुसार निवड करण्याच्या वृत्तीला आळा बसावा, हाही याचा उद्देश आहे.प्रत्येक वेळी एक अशा प्रकारे प्रत्येक पालकांना तीन फेऱ्यांमध्ये मूल देऊ केले जाईल. प्रत्येक फेरीत देऊ केले जाणारे मूल वेगळे असेल. पालकांनी यापैकी एकही मूल स्वीकारले नाही तर त्यांचे नाव प्रतिक्षायादीच्या शेवटी टाकले जाईल. या तीन फेऱ्यांमध्ये दाखविलेल्या मुलांपैकी एखादे मूल निवडण्याची संधी त्यांना किमान ९० दिवसांनंतरच पुन्हा मिळू शकेल.४८ तासांची मुदतएखाद्या मुलाची ‘प्रोफाईल’ पाठविल्यापासून ते मूल हवे की नको याचा निर्णय घ्यायला इच्छुक पालकांना ४८ तासांची मुदत असेल. त्यांनी ते मूल घ्यायचे ठरविले तर पुढील औपचारिकता पूर्ण करून त्यानंतर औपचारिक दत्तक आदेश घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला जाईल.