ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज आणि आरसीबीचा खेळाडू ख्रिस गेलनं भारतात कंपनी खरेदी केली आहे. बंगळुरुस्थित आयओएनए या एंटरटेनमेंट कंपनीमध्ये गेलनं पैसा लावला आहे. भारतातील क्रीडाप्रेमींसाठी गेल एक नवीन अड्डा तयार करत आहे. त्यामध्ये वर्चुअल गेम खेळल्या जातील. माध्यमांशी बोलताना ख्रिस गेल म्हणाला की, मी एक कौटुंबिक व्यक्ती आहे. आणि आयओएनए सारख्या परिवारासोबत जोडलो गेल्याचा मला आनंद आहे. गुंतवणुक कऱण्यासाठी भारतासाठी जगात दुसरा कोणताही चांगला पर्याय नसच्याही गेलनं यावेळी स्पष्ट केलं. आयओएनएकडे बंगळुरुत वर्जिनिया मॉलमध्ये 70,000 स्केअर फूट गेंमिग झोन आहे. गेलसोबत आयओएनएनं 200 कोटीरुपयांचा प्रोजेक्ट सुरु करणार आहे. यामध्ये गेल किती रुपयांची गुंतवणूक कऱणार आहे याबबात अद्याप कोणतेही वृत्त समोर आलेले नाही.
ख्रिस गेलनं भारतात खरेदी केली कंपनी
By admin | Published: July 14, 2017 4:47 PM