शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

कडक सॅल्यूट! आई-वडील अशिक्षित पण मुलांना शिकवलं, सक्षम केलं; 4 पैकी एक IAS, 3 अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:10 PM

आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.

जीवनात कठोर संघर्ष करूनच यश मिळवता येते. कठीण परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेऊनच यश मिळू शकते. संघर्षाचे युग संपले की यशाचे पर्व सुरू होते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. जी समजल्यावर फिल्मी वाटेल पण ती खरी आहे. खरं तर आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.

प्राचार्य श्रवण कुमार सैनी, ज्यांच्या पालकांनी शाळा कधीच पाहिली नसेल, पण आपल्या चार मुलांना इतकं शिकवलं की एक मुलगा आयएएस आहे आणि तीन मुलं मोठ्या पदांवर आहेत. श्रवण कुमार सैनी सांगतात की, त्यांचे वडील छोटे शेतकरी होते आणि आई-वडील दोघेही कधीच शाळेत गेले नाहीत, पण त्यांनी आम्हा सर्व भावांना अभ्यासाची इतकी प्रेरणा दिली की आज सर्वजण यशस्वी टप्प्यावर आहेत.

श्रवण कुमार सैनी यांनी सांगितले की 7 भाऊ आणि बहिणी होत्या. वडील करत असलेल्या शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून होतं. अशा परिस्थितीत चारही भाऊ वडिलांना मदत करण्यासाठी शेतात जायचे आणि शेतात गाई-म्हशी चरून घरी परतायचे आणि शाळेत जायचे. त्यांनी सांगितले की, वडिलांचा संघर्ष आणि आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना वेदना होत होत्या आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, आज हे चारही भाऊ आपल्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत.

चार भावांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक सरकारी शाळेत घेतले आणि चुरू येथील लोहिया कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षणही घेतले. याचा परिणाम असा झाला की थोरला भाऊ डॉ. नवरंग लाल सैनी IAS आणि धाकटा छगनलाल सैनी RTDC मध्‍ये मॅनेजर आणि तिसरा भाऊ जो या जगात नाही पण तो गोविंद सैनी देखील RTDC चे चेअरमन राहिले आणि लहाण असलेले श्रावण कुमार सैनी प्राचार्य आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी