नवी दिल्ली : सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटांवर सचित्र आरोग्यविषयक इशारा छापण्याच्या संदर्भातील नवे नियम येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येतील, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत जाहीर केले.राजस्थान उच्च न्यायालयाने सचित्र आरोग्यविषयक इशारा देणारा हा नवा नियम १ एप्रिल २०१६पासून लागू करण्याचा आदेश दिला आहे. सरकार त्याचे पालन करेल, असे नड्डा म्हणाले. या सचित्र आरोग्य इशाऱ्याचा उद्देश युवक, बालके आणि अशिक्षित लोकांना या तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांपासून सावध करणे हा आहे.मात्र, सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवरील सचित्र इशाऱ्याचा आकार पाकिटावरील प्रमुख चित्राच्या आकाराच्या ८५ टक्केऐवजी ५० टक्के करण्यात यावा, अशी सूचना संसदीय समितीने केली आहे. हा अहवाल एक-दोन दिवसांतच संसदेत सादर केला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
सिगारेटचा ‘इशारा’ पुन्हा होणार छोटा
By admin | Published: March 16, 2016 8:40 AM