शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

माणसे जोडण्याचे सिनेमा प्रभावी माध्यम!

By admin | Published: November 21, 2014 2:23 AM

विभिन्न भाषा व संस्कृतीचे लोक सिनेमामुळे एकत्र येतात. सिनेमा एक प्रकारे माणसे जोडण्याचेच प्रभावी माध्यम आहे. चित्रपट उद्योगातील लोकांनी हा वारसा असाच पुढे चालवावा

सद्गुरू पाटील, पणजीविभिन्न भाषा व संस्कृतीचे लोक सिनेमामुळे एकत्र येतात. सिनेमा एक प्रकारे माणसे जोडण्याचेच प्रभावी माध्यम आहे. चित्रपट उद्योगातील लोकांनी हा वारसा असाच पुढे चालवावा, असे आवाहन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केले. ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गुरुवारी दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.गोव्यासंबंधीच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ म्हणाले, माझा गोव्याशी खूपच जुना संबंध आहे. माझ्या पहिल्यावहिल्या ‘सात हिंदुस्तानी’ यासह अनेक सिनेमांचे चित्रीकरणही गोव्यातच झाले. गोव्यातील प्रेमळ माणसे, बहुविध संस्कृती, देखणे सागरकिनारे, आल्हाददायी वातावरण मला भावते, असे अमिताभ यांनी नम्रपणे नमूद केले. गोव्याला ‘इफ्फी’चे कायमस्वरूपी केंद्र बनविल्याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. सिनेसृष्टीतील आमच्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आम्ही नवा इतिहास निर्माण करू शकत नाही, असे सांगत त्यांनी वडील स्व. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘कोशिश करनेवालों की हार नही होती,’ या कवितेच्या काही पंक्ती उद्धृत केल्या. सिनेसृष्टीतील योगदानाबाबत दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांना अमिताभ आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘सेंटेनरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. गोव्यात आपण ‘इफ्फी’साठी पहिल्यांदाच आलो. पुरस्काराबद्दल रजनीकांत यांनी आनंद व्यक्त केला. ‘इफ्फी’त दरवर्षी नवनव्या सुविधा निर्माण होतील, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. पुढील ‘इफ्फी’त आणखी सुविधा पुरवल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.