नवी दिल्ली: सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत. आंदोलनादरम्यान कोणीही रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करत असल्यास त्याला जागेवरच गोळ्या घालण्याच्या सूचना आंगडींनी दिल्या आहेत. जर कोणीही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताना दिसला, तर त्याला त्याच क्षणी गोळ्या घाला, असे आदेश जिल्हा आणि रेल्वे प्रशासनाला दिल्याची माहिती आंगडी यांनी दिली. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान पश्चिम बंगालसह इतर अनेक राज्यांमध्ये आंदोलकांनी रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान केल्याबद्दल आंगडी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना आंगडी यांनी प्रशासनाला सूचना दिल्याचं सांगितलं.
CAA: रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला; राज्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 9:22 PM