दुमका - केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांकडून या विधेयकाला विरोध होत असतानाच देशातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत प्रथमच जाहीरपणे भाष्य केले आहे. मोदींनी या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि सहकारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कालपर्यंत देशाला बदनाम करण्याचे जे काम पाकिस्तान करायचा ते आता काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असा आरोप मोदींनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुमका येथे प्रचारसभा घेतली. त्यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेस आणि त्यांचे सहकारी वाद निर्माण करत आङेत. त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसल्याने जाळपोळ करत आहेत. मात्र ही जाळपोळ करणारे कोण आहेत, हे त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून समजून येत आहे, असा टोला मोदींनी लगावला.
काँग्रेस पाकिस्तानप्रमाणे देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय, CAB वरून मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 5:16 PM