फर्स्ट सिटीच्या बिल्डरसह अनेकांवर गुन्हे नागपूर : अडीच वर्षात सदनिकेचा ताबा देण्याची बतावणी करून साडेबारा लाख रुपये घेणाऱ्या बिल्डर तसेच या प्रकल्याच्या
By admin | Published: January 06, 2016 1:52 AM
गगनदीपसिंग जगदीपसिंग कोहली (वय ३२, रा. सहारा सिटी, गवसी मानापूर) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिटॉक्स बिल्डर ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, चौरंगी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, एमएडीसी नागपूर सेज फर्स्ट सिटी प्रकल्पाचे संबंधित अधिकारी आणि मार्केटींग एजंटस्ना या प्रकरणात आरोपी बनविल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला आहे.
गगनदीपसिंग जगदीपसिंग कोहली (वय ३२, रा. सहारा सिटी, गवसी मानापूर) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिटॉक्स बिल्डर ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, चौरंगी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, एमएडीसी नागपूर सेज फर्स्ट सिटी प्रकल्पाचे संबंधित अधिकारी आणि मार्केटींग एजंटस्ना या प्रकरणात आरोपी बनविल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला आहे.कोहली यांच्या तक्रारीनुसार, मिहान सेज प्रकल्पात फर्स्ट सिटीचा प्रकल्प उभारून त्यात आलिशान सदनिका देण्याची जाहिरात उपरोक्त बिल्डर, प्रकल्प अधिकारी आणि एजंटस्नी केली केली होती. प्रकल्पाचे काम ३० महिन्यांत पूर्ण करून ताबा देण्याचाही करार बिल्डरने केला होता. त्यानुसार, कोहली यांनी २० सप्टेंबर २०१० ला आपल्या आईंच्या नावे प्रेस्टीज -२ बी मध्ये १९४५ चौरस फुटाची सदनिका (०५०३) बुक केली. त्यापोटी १२ लाख, ४९ हजार ६६३ रुपये धनादेशाद्वारे दिले. संबंधित बिल्डरकडून कोहली यांना २३ ऑक्टोबर २०१० ला अलॉटमेंट लेटर देण्यात आले. त्यातही ३० महिन्यात सदनिकेचा ताबा देण्याचे नमूद केले. प्रत्यक्षात ५ वर्षे होऊनही सदर ठिकाणी कोणतेही बांधकाम न करता बुकिंगची रक्कमही परत केली नाही. त्यामुळे कोहली यांनी रिटॉक्स बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. / चौरंगी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. , एमएडीसी नागपूर सेज फर्स्ट सिटी प्रोजेक्टचे संबंधित अधिकारी आणि मार्केटिंग एजंट यांच्यावर संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप लावला. कोहलीसोबत उपरोक्त आरोपींनी अनेकांची फसगत केल्याचे उघड झाल्यामुळे सोनेगाव पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखेच्या आर्थिक तपास पथकाकडे सोपविण्यात आला आहे. --