शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

शहर सिंगल क्राईम बातम्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 12:00 AM

सार्वजनिक शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या

सार्वजनिक शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर : भवानी पेठ, घोंगडे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयात अज्ञात कारणावरून हमीद शेख (वय ५५) या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ६.१५ वा. घडला. हमीद शेख हा सकाळी शौचालयासाठी गेला होता. त्याने अंगावरील कपड्याच्या सहायाने गळफास घेतला. त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
महिलेस बेदम मारहाण
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे राहत्या घराशेजारी पडक्या वाड्यातील पांढरी माती का टाकली म्हणून संगीता बताश काळे (वय ३५) या महिलेस तानाजी नामदेव काळे व अन्य तिघांनी काठीने बेदम मारहाण केली. यात जखमी झाल्याने त्यांना करकंब व पंढरपूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून सोलापुरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले. याची सिव्हिल चौकीत नोंद झाली आहे.
लॅबमधून लॅपटॉपची चोरी
सोलापूर : वालचंद कॉलेज ॲडव्हान्स्ड एमबेडेड लॅबमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ४२ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. दि. २९ जुलै रोजी रात्री ११.४0 वा. हा प्रकार घडला. या प्रकरणी पृथ्वीराज परमेश्वर तांबे (वय ३२, रा. उमानगरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोसइं सोनोने करीत आहेत.
डिव्हायडरला धडकून मोटरसायकलस्वार जखमी
सोलापूर : हॉटेल प्रथमसमोर डिव्हायडरला धडकून मोटरसायकलचे नुकसान केल्याप्रकरणी सोमनाथ नागनाथ गायकवाड (रा. सदर बझार) याच्याविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. ९ जुलै रोजी दुपारी १२.३0 वा. घडला. शोरूममध्ये रिपेअरीकरिता आलेली मोटरसायकल (क्र.एमएच-१३ एएम-७0९९) ही ट्रायल बघत असताना वीरेश बसवराज निला (वय २४, रा. ४५९, पश्चिम मंगळवार पेठ) हा पाठीमागे बसला होता. मोटरसायकल डिव्हायडरला धडकून दोघेही जखमी झाले व मोटरसायकलचे नुकसान केले. तपास पो.हे.कॉ. वाघमारे करीत आहेत.
पोलिसावर तलवारीने हल्ला
सोलापूर : सदर बझार येथील बेरिया हॉलसमोर दोन मोटरसायकलवर सहा जण बसून जात होते. त्यापैकी एका मोटरसायकलवर (क्र.एम.एच.१३ एआर.४९८८) एका इसमाच्या हातात नंगी तलवार होती. ती काढून घेण्यासाठी कर्तव्यावर असलेले बीट मार्शल पो.कॉ. कदम गेले असता त्यांच्या अंगावर जाऊन तलवारीने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ६.३0 वा. घडाला. या प्रकरणी रॅम्बो, विकी, रॅम्बोचा भाऊ ( सर्व रा. शिक्षक सोसायटी) व अन्य तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोसइं कोकरे करीत आहेत.