शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

शहर सिंगल, क्राईम बातम्या..(सदरच्या बातम्या पानावर वाचल्या आहेत़ )

By admin | Published: October 03, 2015 12:20 AM

केंगनाळकर शाळेत आजी-आजोबा मेळावा

केंगनाळकर शाळेत आजी-आजोबा मेळावा
सोलापूर : स्वागतनगर येथील कै.रामगोंडप्पा केंगनाळकर हायस्कूल व कै.थोबडे प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आजी-आजोबा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी गिरमलप्पा टाकळीकर, विरुपाक्षप्पा नंदर्गी, मुख्याध्यापक विद्यानंद स्वामी, नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिकातर्फे वृक्षारोपण
सोलापूर : सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सावरकर जलतरण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गुरूलिंग कन्नूरकर, घनशाम दायमा, महादेव माने, छाया मुचंडे, क्रीडा अधिकारी नजीर शेख, अप्पासाहेब कनाळे, जयंत रायते, वसंतराव भंडारी, महादेव माने, सुधाकर पंढरपूरकर, मित्रसेन पांढरे, विजय कुलकर्णी, कांतीभाई निमाणी आदी उपस्थित होते.

भाऊराव पाटील यांना आदरांजली
सोलापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त सम्राट चौक येथील पुतळ्यास उमाबाई र्शाविका कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रचार्य सुकुमार मोहोळे, प्रा. विलास लेंगरे, प्रा. अशोक म्हमाणे, गणेश लेंगरे, प्रा. प्रतिभा कंगळे, प्रा. अविनाश मुळकुटकर, प्रा. सारिका सरवदे, प्रा. हायगोंेडे आदी उपस्थित होते.

जागेच्या कारणावरून इसमास मारहाण
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगी येथे घरजागेच्या कारणावरून सतीश जिजण्णा वाघमारे व अन्य तीघांनी केलेल्या मारहाणीत वसंत रामा वाघमारे (वय 42) हे जखमी झाले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी 7.30 वा. घडला. त्यांना उपचारासाठी सरनाबाई वाघमारे यांनी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. सिव्हिल चौकीत नोंद झाली आहे.

स्टोव्हच्या भडक्यात महिला जखमी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील राहत्या घरी स्टोव्हवर दुध गरम करीत असताना झालेल्या भडक्यात सोनाली नागराज कोशे?ी (वय 24) ही महिला जखमी झाली. हा प्रकार गुरूवारी रात्री 11.30 वा. घडला. तिला उपचारासाठी पती नागराज कोशे?ी यांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

पोलीसात तक्रार केल्याच्या कारणावरून मारहाण
सोलापूर: पोलिसात तक्रार का केली असा जाब विचारत दादासाहेब रामचंद्र घायतिडक व अन्य 9 जणांनी केलेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले. बाबु कोंडीबा घायतिडक (वय 65), हणमंतू बाबु घायतिडक (वय 26), सुमन बाबु घायतिडक (वय 60), विठ्ठल बाबु घायतिडक (वय 30 सर्व रा.काळेगांव ता. बार्शी) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार दि.27 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. घडला. चौघांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

शिवी देण्याच्या कारणावरून मारहाण
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे आम्हाला शिवी का दिली असा जाब विचारत ईरण्णा वाघमारे व इतर तिघांनी लोखंडी सळईने केलेल्या मारहाणीत उत्तम केशव वाघमारे (वय 45) हा गंभील जखमी झाला. हा प्रकार गुरूवारी रात्री 9 वा. घडला. मारहाणीत जखमी झाल्याने उत्तम वाघमारे यांना मंद्रुप येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथुन पुढील उपचारासाठी पुतण्या उत्कर्ष वाघमारे याने सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

सोलापूर : लांबोटी येथील शिरापूर रोडवर अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दमदाटी करीत एका महिलेस तानाजी सर्वगोड व इतरांनी सत्तूरने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी 4.30 वा. घडला. सदर महिला ही मोहोळला जाण्यासाठी रस्त्यावर थांबली असताना हा प्रकार घडला. महिलेस उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)

जमीन खरेदी विक्री चालू करा
सोलापूर :शेती व जमीनीचे उतारे सुधारीत नसल्याने खरेदी विक्री व्यवहार ठप्प आहे. लोकांचे नुकसान होत आहे. 7/12 उतार्‍यावरून खरेदी विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी बसपाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब लोकरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)