शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शहर सिंगल क्राईम बातम्या..

By admin | Published: September 02, 2015 11:32 PM

महिलेने केले औषध प्राशन

महिलेने केले औषध प्राशन
सोलापूर : आर्य चाणक्य नगर सैफुल येथील राहत्या घरी घरगुती कारणावरून मनीषा लक्ष्मण पाटील (वय 30) या महिलेने विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार मंगळवारी रात्री 11 वा. घडला. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

स्टोव्हच्या भडक्यात महिला जखमी
सोलापूर : हत्तुरेवस्ती येथील स्वामी विवेकानंद नगरातील राहत्या घरी स्वयंपाक करीत असताना उडालेल्या स्टोव्हच्या भडक्यात कविता सूर्यकांत कस्तुरे (वय 26) ही महिला गंभीर जखमी झाली. हा प्रकार मंगळवारी रात्री 11 वा. घडला. पती सूर्यकांत कस्तुरे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

टमटम-टँकरची धडक ; तिघे जखमी
सोलापूर : मार्केट यार्डकडून बोरामणी चौकाच्या दिशेने जाणार्‍या टमटमला पाठीमागून येणार्‍या टँकरने दिलेल्या धडकेत तिघे जखमी झाले. हा अपघात दुपारी 2 वा. घडला. अनुसया दौरप्पा म्हेत्रे (वय 45 रा. ईरण्णा वस्ती), भीमाबाई सिद्राम वम्मेवरू (वय 40) युवराज नवनाथ भोसले (वय 49, दोघे रा. रामवाडी, धोंडिबा वस्ती) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

मुलीकडून विषारी औषध प्राशन
सोलापूर : मोहननगर कुंभार गल्ली येथील राहत्या घरी मोनाली मोहन बोराडे (वय 20) या मुलीने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार बुधवारी सकाळी 7.30 वा. घडला. तिला उपचारासाठी भाऊ सूर्यकांत बोराडे याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

कारच्या धडकेत तरुण ठार
सोलापूर : पुणे-हैदराबाद रोडवरील रघोजी ट्रान्सपोर्ट समोरुन रस्ता ओलांडत असताना अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दीपक र्शीरंग साळुंके (वय 22, रा. भवानी पेठ, घोंगडे वस्ती) हा तरुण ठार झाला. हा अपघात दि.29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 वा. घडला. अंबादास साळुंखे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

शिंदीच्या नशेत तरुणाने घेतला गळफास
सोलापूर : लाकूड बाजार, झोपडप?ी येथे राहत्या घरी हुसेन हबीब नदाफ (वय 26) सिंदीच्या नशेत हुसेन हबीब नदाफ (वय 26) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी 5 वा. घडला. घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घरातील पत्र्याच्या वाशाला दोरीने गळफास घेतला. त्याला फिरोज नदाफ याने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील राहत्या घरी धुळप्पा शंकर सुतार (वय 40) याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी सकाळी 6.30 वा. घडला. त्याला उपचारासाठी अशोक बिराजदार यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिल चौकीत नोंद झाली आहे.

तरुणास मारहाण करून लुटले
सोलापूर : हरिभाई देवकरण शाळेच्या मागील रोडवरून पायी चालत जात असताना रिक्षा चालक व अन्य दोघांनी दीपक व्यंकटेशराव पुजारी (वय 25, रा. भाग्यर्शी पार्क, विमानतळाजवळ, सोलापूर) यास मारहाण करून लुटले. हा प्रकार 31 ऑगस्ट रोजी रात्री 8.45 वा. घडला. अज्ञात लोकांनी तोंड दाबून मारहाण करीत 10 हजारांचा हँडसेट व दोन हजार रुपये रोख अशी एकूण 12 हजारांची लूट केली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोसई कोकरे करीत आहेत.

दहा हजारांची पर्स पळवली
सोलापूर : सात रस्ता येथील लक्ष्मी को-ऑप. बँकेतून काढलेली 10 हजारांची रक्कम शिल्पा वैभव कुलकर्णी (वय 40, रा. 70 अंत्रोळीकर नगर भाग-2) या पर्समध्ये घेऊन गाडीच्या डिकीत ठेवत असताना अज्ञात मोटरसायकलस्वाराने हिसका मारून पळवली. हा प्रकार मंगळवारी दुपारी 1.15 वा. घडला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर कलाल करीत आहेत.