CJI D. Y. Chandrachud: भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेकविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बार काउंसिलच्या याचिकेची सुनावणी सुरू असताना वकिलांना सरन्यायाधीश चंद्रचडू यांनी चांगलेच सुनावले. मात्र, आता पुन्हा एकदा वकिलांनी लवकरची तारीख मिळण्यासाठी चलाखी करण्याचा प्रयत्न केला. यावरून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला चांगलेच सुनावले.
लवकर तारीख मिळविण्यासाठी वकिलाने दुसर्या खंडपीठासमोर प्रकरणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, तर प्रकरण आधीच सीजेआयने १७ एप्रिलसाठी सूचीबद्ध केले होते. एका वकिलाने सरन्यायाधीश चंद्रचूड यांना एका प्रकरणाचा दुसऱ्या खंडपीठासमोर उल्लेख करू शकतो का? असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी सीजीआय चंद्रचूड भलतेच संतापले.
तुमची चलाखी माझ्यासमोर चालणार नाही, हस्तक्षेप करु नका
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तुमची तारीख १७ तारीख आहे, तुम्हाला १४ तारखेसाठी दुसर्या खंडपीठासमोर नमूद करायचे आहे का? अशी विचारणा करत, माझ्याशी या युक्त्या खेळू नका. तुमची चलाखी इथे चालणार नाही. आधीच्या तारखेसाठी तुम्ही त्याचा इथे आणि नंतर इतरत्र उल्लेख करू शकत नाही. माझ्या अधिकारात हस्तक्षेप करु नका. जर १७ व्या क्रमांकासाठी तुमची याचिका सूचीबद्ध केली असेल तर ती तेव्हाच सुनावणीसाठी घेतली जाईल, या शब्दांत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला चांगलेच फटकारले.
दरम्यान, झाल्या प्रकराबाबत वकिलाने माफी मागितली. यावर, होय तुम्हाला माफ आहे, पण माझ्या अधिकारात गोंधळ घालू नका. असे पुन्हा एकदा सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"