तेलंगणाः हैदराबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या करण्यात आलेल्या एन्काऊंटरवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मोठं विधान केलं आहे. हैदराबाद एन्काऊंटरमधील ठार करण्यात आलेल्या घटनेवर त्यांनी टीका केली आहे. जोधपूरच्या एका कार्यक्रमात न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्याय कधीही प्रतिशोधाच्या भावनेनं करू नये, जर न्याय प्रतिशोधाच्या भावनेनं केल्यास त्याला अर्थ राहणार नाही. जोधपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात न्यायमूर्ती एस. ए बोबडे म्हणाले, कोणताही न्याय घाईघाईत करू नये, जर न्याय हा प्रतिशोधाच्या भावनेनं केला गेल्यास त्याचा गाभा नाहीसा होईल. यावेळी कायदामंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित होते.
प्रतिशोधाच्या भावनेनं केलेला न्याय म्हणजे न्याय नाही; हैदराबाद एन्काऊंटरवर CJIचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 3:42 PM