सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असलेल्या खान सरांची अडचण वाढली आहे. अतिशयोक्तीपूर्ण दावे केल्याप्रकरणी त्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) खान स्टडी ग्रुपला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनफेअर ट्रेड प्रॅक्टिससाठी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आयुक्त निधी खरे आणि अनुपम मिश्रा यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.
...म्हणून खान सरांना ठोठावण्यात आला दंड? -माध्यमांतील वत्तांनूसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा निकाल जाही झाल्यानंतर, अनेक कोचिंग क्लासेस त्यांची जाहिरात करण्यासाठी अतिशयोक्तीपूर्ण आणि बऱ्याचदा तर खोटे दावेही करताना दिसतात. एवढेच नाही, तर पोस्टर आणि होर्डिंग्सवर काही यशस्वी उमेदवारांचे फोटो लोवून, ते आपलेच विद्यार्थी असल्याचेही म्हटले जाते. अशाच एका प्रकरणात खान स्टडी ग्रुपला दंड ठोठावण्यात आला आहे.
सीसीपीएनं जारी केली नोटीस -केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA), भ्रामक आणि अतिशयोक्तीपूर्ण दावे करणाऱ्या अनेक कोचिंग संस्थांना नोटिस बजावली आहे. याच यादीत खान स्टडी ग्रूपचाही समावेश आहे. खरे तर, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा-2022 मध्ये निवड झालेल्या 933 विद्यार्थ्यांपैकी 682 विद्यार्थ्यी आपले असल्याचा दावा खान सरांनी केला होता, असा आरोप आहे.