नवी दिल्ली- गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मतदानाची मतमोजणी सध्या सुरू आहे. सकाळपासून समोर येत असलेल्या ट्रेण्ड्समध्ये भाजपा आघाडीवर असून भाजपाला कडवी टक्कर देणारा काँग्रेस पक्ष पिढाडीवर आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपा स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. गुजरात व हिमाचल प्रदेशामध्ये आम्ही स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करू, असं दावा राजनाथ सिंह यांनी सोमवारी सकाळी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिक्टरी साईन दाखवून गेले संसदेतगुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. देशभरात भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संसदेत पोहोचतात व्हिक्टरी साईन दाखवत या निकालामुळे आपण आनंदित असल्याचं दाखवून दिलं.
भाजपाकडून जल्लोषाची तयारी, मुंबईत लागले पोस्टर्स
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपाने मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच जल्लोषाची तयारी सुरु केली होती. रविवारी रात्री भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध दावे करण्यात येत होते. तर दुसरीकडे भाजपाने मतमोजणीपूर्वीच मुंबईमध्ये विजयाचे पोस्टर्सही लावले होते. गुजरातमध्येही रविवारी रात्रीच भाजपाकडून विजयाची तयारी पूर्ण केली होती. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.