नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरू केला आहे. दिल्ली हरियाणा सीमेवर (सिंघू बॉर्डर) आज सकाळपासून स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात केली आहे. तसेच आंदोलकांनी येथील रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू होती. रस्ता अडवून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. आंदोलकांनी शुक्रवारपर्यंत जागा रिकामी केली नाही तर आम्ही येथे हजारोंच्या संख्येने पुन्हा येऊ, असा इशारा दिला आहे. २६ जानेवारीला जे घडले ते सहन करता येण्याजोगे नाही. आतापर्यंत आम्ही यांना शेतकरी समजत होतो. मात्र आता सत्य परिस्थिती आमच्यासमोर आली आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
रस्ता मोकळा करा, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात स्थानिक आक्रमक; दिल्लीच्या सीमेवर मोठा गोंधळ
By बाळकृष्ण परब | Updated: January 28, 2021 16:35 IST
Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरू केला आहे.
रस्ता मोकळा करा, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात स्थानिक आक्रमक; दिल्लीच्या सीमेवर मोठा गोंधळ
ठळक मुद्देसिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी रस्ता अडवून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा स्थानिकांनी केला दावा आंदोलकांनी शुक्रवारपर्यंत जागा रिकामी केली नाही तर आम्ही येथे हजारोंच्या संख्येने पुन्हा येऊ, असा दिला इशारा