नितीन अग्रवाल - नवी दिल्लीराजीव गांधी यांनी भारतात संगणक युगाचा प्रारंभ केला. नरसिंह राव यांनी दूरसंचार क्रांती आरंभली. काँग्रेसच्या नेत्यांनी रचलेल्या याच पायावर उत्तम प्रयोग करून नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. वर्षभराच्या सत्तेच्या काळात ते व्हर्च्युअल वर्ल्डचे जणू सुपर स्टार बनले आहेत. सरकारची वर्षभराची कारकीर्द जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीही हे माध्यम अतिशय प्रभावीपणे त्यांनी वापरले.मोदींनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढली तेव्हा संपूर्ण जग अवाक् झाले. सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या नेत्यांचा देश असलेल्या चीनपासून अमेरिकेपर्यंतच्या ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’मध्ये या ‘सेल्फी’ची जोरदार चर्चा झाली. चीन दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोदी चीनी सोशल मीडिया ‘वीबो’वर येतात. जपान दौऱ्यापूर्वी जपानी भाषेत टिष्ट्वट करतात. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ते मीडियाचा नाही तर सोशल मीडियाचा वापर करतात. चीनमध्ये त्यांचे भव्यदिव्य स्वागत असो वा टेराकोटा म्युझियमधील छायाचित्रे अशी क्षणाक्षणाची माहिती मोदींनी सोशल मीडियावर ‘शेअर’ केली. मंगोलियामध्ये पोहोचल्यावरही त्यांनी आपली ‘सेल्फी’सोशल मीडियावर टाकली. कधी छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील मुलांसोबतच्या जुगलबंदीचा व्हिडिओ तर कधी ‘मन की बात’ कार्यक्रमाबाबतचा मोदींचा संदेश टिष्ट्वटरवर पडतो. भूकंपप्रभावित नेपाळीची मदत असो, पाकिस्तानी क्रिकेट संघाला शुभेच्छा असो, स्वच्छ भारत अभियान वा जनधन योजना असो, पंतप्रधानांनी या प्रत्येक बाबीसाठी सोशल मीडियाचा वापर केला. सोशल मीडियाची शिडी चढून केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगात त्यांची लोकप्रियतेचे शिखर गाठले. च्सोशल मीडियाद्वारे लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासोबतच मोदींना यामुळे अनेक वादांनाही तोंड द्यावे लागले. वडोदरा येथे मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर कमळ या निवडणूक चिन्हासोबत काढलेल्या ‘सेल्फी’ने त्यांनी वाद ओढवून घेतला. च्स्वत:चे नाव कोरलेला सूट परिधान केल्यावरून ते टीकेचे धनी ठरले. केवळ विरोधकच नाही तर त्यांचे ‘व्हर्च्युअल फ्रेंड्स’ आणि ‘फॉलोअर्स’नी त्यांच्यावर तीव्र ताशेरे ओढले. टिष्ट्वटरवरून शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे त्यांनी केलेले आवाहन असो वा सानिया मिर्झाविरूद्ध त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या अभ्रद विधानांवर त्यांनी साधलेली चुप्पी असो यावरूनही मोदींवर प्रखर टीका झाली. मोदींवरील व्यंगात्मक आणि उपहासात्मक कमेंट्स, पोस्ट ,टिष्ट्वट्स आणि विनोद सोशल मीडियावर गाजले. मोदींना सोशल मीडियाचे सुपर स्टार बनविण्यामागे अनेक आयटी एक्सपर्ट(माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ)चा हात आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत टिष्ट्वटर हँडल असो वा त्यांचे यूट्युब चॅनल, प्रत्येक माध्यमातून मोदींचे संदेश विजेच्या गतीने जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तज्ज्ञांची ही टीम कमालीची दक्ष असते. साहजिकच मोदींचे हॅशटॅग काही क्षणांत ट्रेंड करायला लागतात.राजीव गांधी यांनी भारतात संगणक युगाचा प्रारंभ केला. राजीव गांधी यांनी सॅम पिट्रोडांच्या मदतीने पाहिलेल्या स्वप्नवत दूरसंचार क्रांतीला नरसिंह राव यांनी रूप दिले. मोदींनी या पायाचा उत्तम वापर करून सत्तेचे शिखर गाठले.