शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:58 AM

डॉक्टरांनी सुरीनचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने रक्तदान केले.

चाईबासा : चकमकीवेळी सीआरपीएफ जवान आणि पोलिसांवर गोळ्या झाडणाऱ्या महिला नक्षलवादीचा जीव वाचविण्यासाठी जवानांनी जंगलामध्ये तात्पुरते हॉस्पिटल उभारले. एवढ्यावरच न थांबता या जवानांनी तिच्यासाठी रक्तदान करत प्राण वाचविला. एकीकडे पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झालेला असताना दुसरीकडे या जवानांनी दाखवून दिलेली माणुसकी विचार करायला लावणारी आहे. ही घटना झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील आहे. 

14 फेब्रुवारीला पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील गोईलकेराच्या इच्छाबेडा जंगलात सर्च ऑपरेशन सुरु होते. यावेळी सीआरपीएफच्या 60 व्या बटालियनचे जवान आणि पोलिसांसोबत नक्षल्यांची गाठ पडली. दोन्ही बाजुने जवळपास एक हजारहून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी वीस वर्षीय महिला नक्षली ननकी सुरीन हीनेही जवानांवर गोळीबार केला. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात सुरीन जखमी झाली. तिच्या पायावर गोळी मारण्यात आली. रक्तस्त्राव झाल्याने ती नक्षल्यांच्या तळाजवळ तडफडत होती. तिचे साथीदार तिला त्याच अवस्थेत सोडून पळाले होते. गोळीबार थांबल्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी राबविलेल्या शोधमोहिमेवेळी सुरीन जखमी अवस्थेत आढळली. 

जवानांनी तिला ताब्यात घेतले. यानंतर मानवतेच्या भावनेतून त्यांनी सुरीनवर प्राथमिक उपचार केले. यासाठी त्यांनी तात्पुरता दवाखाना उभा केला. तिचा रक्तस्त्राव खूप झाल्याने नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे तिची प्रकृती पाहून चाईबासा येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. उपचारादरम्यान तिला रक्ताची गरज होती. 

डॉक्टरांनी सुरीनचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने रक्तदान केले. सीआरपीएफ जवान राजकिशोर प्रधान, अभिनव कुमार आणि संदीप यांनी रक्त देत तिचे प्राण वाचविले. यानंतर सुरीनला जमशेदपूर येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सुरीनकडे घटनास्थळी 0.315 बोअरच्या 30 गोळ्या आढळून आल्या होत्या. तिच्यासोबत 30 नक्षलवादी होते. यामध्ये पाच महिलाही होत्या. धक्कादायक म्हणजे सुरीन जखमी झाली तेव्हा तिला त्याच अवस्थेत सोडून जाताना तिचे साथीदार तिची बंदुकही घेऊन गेले, असे सीआरपीएफचे कमांडर पी सी गुप्ता यांनी सांगितले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPoliceपोलिस