नवी दिल्ली : देशी गुरांच्या कत्तलींवर देशव्यापी बंदी आणण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्र सरकारला उत्तर मागितले आहे. देशी गुरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचा दावा करीत पर्यावरणवादी वकील अश्विनीकुमार यांनी लवादाकडे धाव घेतली. त्यावर न्या. यू.डी. साळवी यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने कृषी मंत्रालयाला ३० आॅक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचा आदेश दिला.विकसित देशांनी गुराढोरांचे वैविध्य जपताना देशी वाणाच्या गुरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर संकरित वाणांच्या गुरांची पैदास न वाढवता देशी गुरांची दूध उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जावे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशी गुरांची कत्तल बंद करा
By admin | Published: October 01, 2015 12:14 AM