शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

सरकारी बँका, उपक्रमांमध्ये ‘कॅम्पस’ भरती बंद करणार

By admin | Published: April 16, 2017 12:54 AM

मुंबईच्या कामगारवस्तीत राहणाऱ्या चार तरुण-तरुणींनी केलेल्या याचिकेवर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांची बूज राखून केंद्र सरकारने सरकारी

नवी दिल्ली: मुंबईच्या कामगारवस्तीत राहणाऱ्या चार तरुण-तरुणींनी केलेल्या याचिकेवर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांची बूज राखून केंद्र सरकारने सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये गेली १० वर्षे रुढ झालेली ‘कॅम्पस भरती’ बंद करण्याचे ठरविले आहे.खासगी उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशा प्रकारे ‘कॅम्पस भरती’ सर्रास होत असते व चांगल्यात चांगले विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडताच त्यांना लठ्ठ पगार देण्याची त्यांच्यात जणू स्पर्धा सुरू असते. अशा प्रकारे कर्मचारी नेमणे घटनाबाह्य आहे व तसा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही ती सुरू ठेवणे बेकायदा आहे, असा सल्ला विधी मंत्रालयाने दिल्यानंतर ही पद्धत बंद करण्याचे ठरविले असल्याचे समजते.ज्या निकालाच्या दाखल्याने ही पद्धत बंद करण्याचा सल्ला दिला ते प्रकरण सोनाली प्रमोद धावडे (भायखळा), विशाल निकम (ना. मे. जोशी मार्ग), शिल्पा सीताराम जड्यार (लालबाग) आणि कविता गणपत टक्के (करी रोड) या मुंबईच्या चार तरुण-तरुणींनी दाखल केले होते. या चौघांचे प्रकरण फक्त सेंट्रल बँक आॅफ इंडियामध्ये केल्या जाणाऱ्या ‘कॅम्पस भरती’ संबंधी होते. परंतु त्यातील निकालात ठरविलेले सूत्र राज्यघटनेशी संबंधित असल्याने निकाल सर्वच सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमांना लागू करण्याचे सरकारने ठरविल्याचे दिसते.या चौघांनी केलेली रिट याचिका मंजूर करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. अजय खानविलकर व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने सेंट्रल बँकेस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्त्या ‘कॅम्पस भरती’ने करणे बंद करण्याचा आदेश १ एप्रिल २०१३ रोजी दिला. याविरुद्ध बँकेने केलेले अपीलही सर्वोच्च न्यायालयाने १९ आॅगस्ट २0१३ रोजी फेटाळले. सन २०१५ मध्ये मद्रास उच्च न्यायालयातही असेच प्रकरण दाखल झाले होते. सुरुवातीस त्या न्यायालयाने अशा भरतीस मनाई करणारा अंतरिम आदेश दिला होता. परंतु नंतरही मनाई उठविली गेली होती. मात्र मद्रास न्यायालयाने मुंबईच्या प्रकरणातील निकाल लक्षात घेतला नव्हता.खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर ‘कॅम्पस भरती’चा प्रकार सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमांमध्येही सुरू झाला होता. स्पर्धेत खासगी उद्योगांच्या समोर टिकाव लागावा यासाठी सरकारी बँका व सरकारी उद्योगांनाही देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षण व व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होऊन बाहर पडणारे हुशार व बुद्धिमान विद्यार्थी थेट नोकरीत घेण्याची मुभा मिळावी, अशी सबब यासाठी देण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)समानता, समान संधीचा भंग- भारतीय राज्यघटनेने नागरिकांना समानता आणि समान संधीचा मुलभूत अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांसाठी सर्व पात्र इच्छुकांना समान संधी देणे सरकारवर बंधनकारक आहे. - रीतसर जाहिरात देऊन अर्ज मागविणे व लेखी परीक्षा आणि मुलाखती घेऊन निवड करणे हा त्याचाच भाग आहे. ‘कॅम्पस भरती’ने राज्यघटनेचा हा दंडक पाळला जात नाही.