रा.स्व.संघ चिंतन बैठकीचा समारोप पदाधिकारी रवाना: मार्चमधील सेभेचे नियोजन
By admin | Published: January 08, 2016 11:19 PM
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवसांच्या चिंतन बैठकीचा शुक्रवारी सायंकाळी सहकार्यवाह भैया जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होऊन देशभरातील विविध प्रांतातून आलेले प्रचारक आपापल्या क्षेत्राकडे रवाना झाले.
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवसांच्या चिंतन बैठकीचा शुक्रवारी सायंकाळी सहकार्यवाह भैया जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होऊन देशभरातील विविध प्रांतातून आलेले प्रचारक आपापल्या क्षेत्राकडे रवाना झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या चिंतन बैठकीस गेल्या मंगळवारपासून प्रारंभ झाला. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे स्वत: तीन दिवस या बैठकीसाठी जळगावात होते. तीन टप्प्यात बैठकतीन टप्प्यात ही चिंतन बैठक झाली. पहिल्या टप्प्यात अ.भा.कार्यकारिणीची बैठक, प्रचारकांचे अनुभव कथन व पुन्हा कार्यकारिणी बैठक झाली. मार्चमधील सभेचे नियोजन११,१२ व १३ मार्च रोजी राजस्थानातील नागौर येथे रा.स्व. संघाच्या अ.भा. प्रतिनिधी सभेची बैठक होणार आहे. या बैठकीतील चर्चेत जे प्रस्ताव मांडायचे आहेत. त्यावर शेवटच्या दिवशी चर्चा झाली. प्रतिनिधी सभेची आखणीही या दरम्यान झाली. सहकार्यवाह भैय्या जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य, दत्तात्रय होजबाळे, भागय्या, कृष्णगोपाल, सुरेशचंद्र, इद्रेशजी, सुहासराव हिरेमठ, अनिरुद्ध देशपांडे व अन्य प्रचारकांची उपस्थिती होती. दुपारी ४ वाजता समारोप झाला.