सुरत : लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात बंद आसारामबापू आणि त्याचा मुलगा नारायणसाईभोवती आयकर विभागाने आपला फास आवळला आहे. विभागाने या बापलेकाच्या २५०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर ३० टक्के कराच्या हिशेबाने ७५० कोटी रुपयांच्या करवसुलीची कारवाई सुरू केली आहे. सुरत आयकर विभागाने यासंदर्भात एक अहवाल तयार करून अहमदाबाद कार्यालयाला पाठविला आहे.२५०० कोटींची संपत्ती उघडआयकर विभागाला आसारामबापूच्या एका साधकाच्या घरून दस्तावेजांच्या ४२ पिशव्या मिळाल्या होत्या. यात अनेक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरही होते. यापैकी बहुतांश उपकरणात दुहेरी पासवर्ड टाकण्यात आला होता. म्हणजेच योग्य पासवर्ड टाकल्यावरही स्क्रीनवर चुकीचा पासवर्ड दिसत होता. ही गुंतागुंत सोडविल्यानंतरच कॉम्प्युटर आणि लॅपटॉप सुरू होऊ शकले. आणि आसारामबापू व नारायणसाईच्या २५०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा भंडाफोडझाला. यासोबतच आयकर विभागाने देशभरातील ७० आश्रमांमध्ये धाडी घातल्या होत्या. या कारवाईनंतर विभागाने शंभरावर मालमत्तांची तात्पुरती जप्ती केली असून तूर्तास त्यांची विक्री करता येणे शक्य नाही. (वृत्तसंस्था)मिळालेल्या माहितीनुसार सुरत आयकर विभागाने तुरुंगात बंदिस्त नारायणसाईची दोनदा चौकशी केली. परंतु आश्रम आणि संपूर्ण व्यवसाय आपले वडील आसारामबापूच सांभाळत असल्याचे त्याने सांगितले. मग विभागाने जोधपूर कारागृहात जाऊन आसारामबापूकडेही संपत्तीबाबत विचारणा केली. परंतु त्यानी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मौन पाळले.
आसारामबापूचा फास आवळला
By admin | Published: April 22, 2016 3:14 AM