शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

'या' राज्यात आतापर्यंत तब्बल 23 आमदारांना कोरोनाची लागण, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:28 PM

"23 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात मंत्र्यांचाही समावेश आहे. जर आमदार आणि मंत्र्यांची ही स्थिती असेल, तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती किती गंभीर असेल, याचा अंदाज सहजपणे लावला जाऊ शकतो."

ठळक मुद्देपंजाबमध्ये आतापर्यंत तब्बल 23 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. पंजाब विधानसभेचे अधिवेश सुरू होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगदेखील उपस्थित होते.

चंदिगड - पंजाबमध्ये आतापर्यंत तब्बल 23 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा करताना ही माहिती दिली. 

अमरिंदर सिंग म्हणाले, ''पंजाब विधानसभेचे अधिवेश सुरू होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. 23 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात मंत्र्यांचाही समावेश आहे. जर आमदार आणि मंत्र्यांची ही स्थिती असेल, तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती किती गंभीर असेल, याचा अंदाज सहजपणे लावला जाऊ शकतो. त्यामुळे परीक्षांसाठी ही वेळ आणि परिस्थिती योग्य नाही.''

आज काँग्रेसच्या हंगामी अधक्ष सोनिया गांधी यांनी जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षांसंदर्भात भाजपाचे सरकार नसलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. याच वेळी अमरिंदर सिंग यांनी नीट-जेईईची परीक्षा घेण्याला विरोध दर्शवला.

या बैठकीत अमरिंदर सिंग आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, या परीक्षा रोखण्यासाठी राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात जायला हवे, असेही म्हटले आहे. मात्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी, न्यायालयात जाण्यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून, या परीक्षा रद्द करण्याची मागणी करायला हवी, असे म्हटले आहे. 

मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा -या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाग घेतला होता. यावेळी कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगल्या पद्धतीने लढत आहात, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तेव्हा, त्यांचे आभार मानत 'मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचे की त्यांना घाबरून राहायचे हे आधी ठरवले पाहिजे, असे मतही उद्धव ठाकरे यांनी या बैठिकीत मांडले.

शाळा सुरू करण्यासंदर्भात काय म्हणाले उद्धव ठाकरे -सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीत कोरोनासह शाळेच्या प्रश्नावरही चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याबाबत चिंता व्यक्त केली. अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे शाळा सुरू केल्यानंतर आपल्याकडेदेखील अमेरिकेसारखी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या -

आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबMLAआमदारSonia Gandhiसोनिया गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जी