रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांवरून दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शनिवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर पैलवानांची भेट घेतली. सीएम केजरीवाल यांनी जंतरमंतरवरून पैलवानांना उघडपणे पाठिंबा दिला. देशाचे नाव लौकिक मिळविणारे पैलवान नाराज असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर चुकीचे काम करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, असेही केजरीवाल म्हणाले.
गँगस्टर प्रकरणात मुख्तार अन्सारींचे भाऊ अफजल अन्सारींनाही 4 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होणार
अरविंद केजरीवाल म्हणाले, कुस्तीपटूंना एफआयआरसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की, सुट्टी घेऊन इथे या, त्यांच्या पाठीशी उभे राहा. जो भारताच्या पाठीशी उभा आहे तो पैलवानांसोबत आहे, असंही केजरीवाल म्हणाले.
आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही जंतरमंतरवर भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत दीपेंद्र हुड्डा ही उपस्थितीत होता. येथे प्रियंका गांधी म्हणाल्या की, हे खेळाडू आमचा अभिमान आहेत. ते कठोर परिश्रम आणि संघर्ष करून देशासाठी पदके जिंकतात. त्यांचे शोषण, त्यांचा अपमान हा देशातील प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे. त्यांना न्याय मिळावा अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. दिल्ली पोलिसांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. देशासाठी पदक जिंकणारे सर्व मोठे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. त्यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.