CM Atishi on Delhi Pollution : दिल्लीतीलप्रदूषणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच, दिल्लीतीलआपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी या प्रदूषणाला 'राष्ट्रीय आणीबाणी' म्हटले असून, या प्रदूषणाचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये रान/गवत जाळण्याच्या घटना वाढल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
हिंदी वृत्तवाहिनी आजतकशी बोलताना आतिशी म्हणाल्या, ही राष्ट्रीय आणीबाणी आहे. कोविडच्या काळात ज्याप्रमाणे आपण राष्ट्रीय वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतून जात होतो, त्याचप्रमाणे आज संपूर्ण उत्तर भारत राष्ट्रीय वैद्यकीय आणीबाणीचा सामना करत आहे. कोविडमध्ये सर्व राज्ये एकत्र आली आणि केंद्रानेही पुढे येऊन अनेक पावले उचलली. पण, केंद्र सरकारला प्रदूषणाची पर्वा नाही. केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात रान जाळण्याच्या घटना कमी करण्यासाठी कोणती पावले उचलली? असा सवाल आतिशी यांनी केला.
भाजपशासित प्रदेशात सर्वाधिक घटनाआतिशी यांनी यावेळी सर्वाधिक रान जाळण्याच्या घटना भाजपशासित प्रदेशात होत असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, 'पंजाबमध्ये या घटना 80 ते 85 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. इतर राज्यांवर नजर टाकली तर उत्तर प्रदेशात हे प्रमाण वाढले आहे, तर मध्य प्रदेशात देशात सर्वाधिक प्रमाणात आहे. भोपाळ, इंदूरचा AQI वाढला आहे. बिकानेर, जयपूर, पाटणा, बुलंदशहरचाही AQI वाढला आहे. या सगळ्याला आम आदमी पार्टी जबाबदार आहे का?
पीएम मोदींनी तातडीची बैठक बोलावली का?केंद्र सरकारवर निशाणा साधत दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, आजपर्यंत पंतप्रधानांनी प्रदूषणाबाबत तातडीची बैठक बोलावली का? काही आपत्कालीन पावले उचलली का? गेल्या 5 वर्षांत त्यांनी एका राज्यातही पाऊल टाकले का? दिल्लीत रान जाळले जात नाही. देशाच्या विविध भागातून, वेगवेगळ्या राज्यांमधून हे दिल्लीत येते. भाजपशासित राज्यांमध्ये या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.