सीएम चरणजीतसिंग चन्नी यांनी ताफा थांबवून वाचवला खड्ड्यात अडकलेल्या गाईचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:39 IST2021-11-15T15:38:21+5:302021-11-15T15:39:08+5:30
काही दिवसांपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचवले होते.

सीएम चरणजीतसिंग चन्नी यांनी ताफा थांबवून वाचवला खड्ड्यात अडकलेल्या गाईचा जीव
चंडीगड: 2022 ला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यातच अनेक नेते चांगली कामे करुन आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी रात्री मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी एका खड्ड्यात पडलेल्या गायीचे प्राण वाचवले. गाय खड्ड्यातून बाहेर येईपर्यंत ते तिथेच उभे राहिला. गाय बाहेर आल्यानंतर त्यांनी गायीच्या पायाला स्पर्श केला. याच्या काही दिवसांपूर्वी पंजाबकाँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांनीही रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेले होते.
सीएम चन्नींनी बचावकार्याचे नेतृत्व केले
पंजाबचे मुख्यमंत्री बनल्यापासून चरणजीत चन्नी आपल्या सामाजिक कार्यामुळे सतत चर्चेत असतात. यातच सीएम चन्नी रविवारी रात्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चमकौर साहिब येथे गेले होते. घरी परतत असताना वाटेत त्यांना एक गाय खड्ड्यात पडल्याचे दिसले. त्यांनी आपली वाहने थांबवून गाय वाचवण्याचे काम सुरू केले. स्वतः टॉर्च घेऊन सीएम चन्नी बचावकार्याचे नेतृत्व करत होते. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर गायीची सुखरूप सुटका करण्यात आली.
जखमी तरुणाला सिद्धूंनी आपल्या ताफ्यात पाठवले
गेल्या बुधवारी नवज्योत सिद्धू पटियालाला जाणार होते. वाटेत त्यांना एका कारचा अपघात झाल्याचे दिसले. त्या अपघातात चालक जखमी झाला होता. रस्त्यावरील वाहने मदत करत नव्हती, त्यानंतर सिद्धूंनी जखमी तरुणाला तरुणाला आपल्या ताफ्याच्या गाडीत बसवले आणि तातडीने रुग्णालयात पाठवले.