शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
2
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
3
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
4
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
5
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
6
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
7
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
8
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
9
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
10
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
11
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
12
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
13
नवऱ्यामुळे मुलीला HIV, Ex बॉयफ्रेंडने शेवटपर्यंत केली सेवा; काँग्रेस आमदारालाही आले गहिवरून
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
15
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
16
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
17
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
18
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
19
Archery world Cup Final : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या दीपिकाचा पदकावर निशाणा; रौप्य पदकाची कमाई
20
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत

“कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही”; भुजबळांच्या ‘त्या’ विधानावर CM शिंदे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 2:33 PM

CM Eknath Shinde: छगन भुजबळांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

CM Eknath Shinde: एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य करत छगन भुजबळ यांचे नाव न घेता स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. 

छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे. आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. यावरून शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळांच्या विधानावर थेट प्रतिक्रिया दिली.

कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही

छगन भुजबळांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने, उर्जा आणि प्रेरणेमुळे महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर होतील. खरे म्हणजे जी बाबच नाही, ओबीसी समाजाचे नेते भेटायला आले होते, तेव्हा माझ्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या बैठकीला होते. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितले होते की, ओबीसी समाजाला धक्का न लावता किंवा अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल. अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी किंवा अन्य समाजामध्ये कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजावर अन्याय न करता, धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनीही छगन भुजबळ यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांची अशी भडक विधाने करायची जुनी सवय आहे. त्यांना काही वेगळे वाटत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागून घ्यावी, भेटून चर्चा करावी. ओबीसी आरक्षण काढून दुसऱ्यांना दिलेच जाणार नाही. अशी शक्यताही नाही. मात्र, आपले आरक्षण काढून दुसऱ्यांना दिले जाणार आहे, असे भासवायचे आणि तुमचे जाणारे आरक्षण मी थांबवले, असे सांगायचे, मोठेपणा घ्यायचा, असे आता वाटू लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मराठा आरक्षणाचा विषय योग्य ट्रॅकवर आहे. छगन भुजबळ यांना वास्तविक ही सगळी परिस्थिती आणि प्रक्रिया माहिती आहे. तरीही संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हे १०० टक्के चुकीचे आहे, या शब्दांत शंभुराज देसाई यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ