शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 5:47 PM

ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत सुरू झालेला संघर्ष आता थेट त्रिपुरात जाऊन पोहोचला आहे. आता, पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर त्रिपुरात झालेल्या हल्लावरून, ममता भडकल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी भाजप नेते आणि गृहंमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

ममता यांनी सोमवारी कोलकाता येथे त्रिपुरा येथील घटनेत जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ममता म्हणाल्या, हा हल्ला गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून झाला. या घटनेमागे त्यांचाच हात आहे. त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच? संशयास्पद अवस्थेत आढळले भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह

ममता म्हणाल्या, या हल्ल्यात सुदीप आणि जया जखमी झाले आहेत. ते विद्यार्थी असून त्रिपुराला गेले होते. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, पोलीस उपस्थित असताना हा हाल्ला झाला. यानंतर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधाही देण्यात आली नाही. उलट त्यांनाच अटक करण्यात आली. एवढेच नाही, तर त्यांना एक ग्लास पाणीही दिले गेले नाही.

भाजपवर हल्ला चढवताना ममता म्हणाल्या, या हिंसक घटनेनंतरही मी मागे हटणार नाही. जेथे भाजपची सत्ता आहे तेथे टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले केले जात आहेत. यानंतरही पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.

...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही, अमित शहाच करत आहेत हल्ले -मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, 'केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय, असे हल्ले शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामागे तेच आहेत आणि त्रिपुरा पोलीस फक्त बघत राहिले. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये, असे हल्ले करण्याची क्षमता नाही. त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांच्या ताफ्यावर काठ्यांसह काही लोकांनी हल्ला केला होता. आता, हे हल्ला करणारे लोक भाजपचेच कार्यकर्ते होते, असा आरोप टीएमसीने केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसTripuraत्रिपुराBJPभाजपा