कोलकाता: अम्फान चक्रीवादळाच्या तडाख्यानं पश्चिम बंगालचं मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत राज्यात ७२ जणांचा अम्फानमुळे मृत्यू झाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिली. आतापर्यंत कधीच अशा प्रकारचं संकट पाहिलं नसल्याचं बॅनर्जी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालला येऊन स्वत: परिस्थिती पाहावी, असं आवाहन त्यांनी केलं. अम्फान चक्रीवादळानं पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. सहा लाख जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. अम्फानमुळे झालेल्या नुकसानाची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. 'आतापर्यंत राज्यात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. मी आतापर्यंत असा विनाश कधीही पाहिला नव्हता. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालला येऊन स्वत: परिस्थिती पाहावी,' असं आवाहन त्यांनी केलं. अम्फानमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.अम्फानचा फटका बसलेल्या राज्यांमधील परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. 'अम्फानमुळे पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची दृश्यं पाहिली. या काळात संपूर्ण देश पश्चिम बंगालसोबत आहे. राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज