महिलेकडून बुटाची लेस बांधून घेणं SDM ला पडलं महागात; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:26 PM2024-01-25T12:26:23+5:302024-01-25T12:37:17+5:30
सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत होता ज्यामध्ये चितरंगीचे एसडीएम असवान राम चिरावन एका महिलेला त्यांच्या बुटाची लेस बांधायला लावताना दिसत आहेत.
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एका महिलेकडून बुटाची लेस बांधून घेणं एका अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी एसडीएमला शिक्षा झाली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी चितरंगीच्या एसडीएमला हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत होता ज्यामध्ये चितरंगीचे एसडीएम असवान राम चिरावन एका महिलेला त्यांच्या बुटाची लेस बांधायला लावताना दिसत आहेत. हे प्रकरण समोर येताच याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दखल घेत एसडीएमला हटवण्याच्या सूचना दिल्या.
सिंगरौली जिले के चितरंगी में एसडीएम द्वारा एक महिला से उनके जूते के फीते बंधवाने का मामला सामने आया है, जो अत्यंत निंदनीय है।
— Chief Minister, MP (@CMMadhyaPradesh) January 25, 2024
इस घटनाक्रम को लेकर एसडीएम को तत्काल हटाने के निर्देश दिये हैं। हमारी सरकार में नारी सम्मान सर्वोपरि है। - CM@DrMohanYadav51
सीएम ऑफिसने याबाबत ट्विट केलं आहे. "सिंगरौली जिल्ह्यातील चितरंगी येथे एसडीएमने एका महिलेला त्यांच्या बुटाची लेस बांधल्याचं प्रकरण समोर आलं आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. या घटनेबाबत एसडीएमला तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या सरकारमध्ये महिलांचा सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोनकच्छच्या तहसीलदार अंजली गुप्ता यांनी शेतकऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. तसेच बांधवगडच्या एसडीएमने देखील एका तरुणाला मारहाण केली होती. त्याच्यावर देखील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.