शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

CM नितीश कुमारांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 1:41 PM

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात नितीश यांनीही जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आता राष्ट्रीय महिला आयोगाने नितीश कुमार यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.  

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो.", असे म्हणत त्यांनी विधानसभेतील विधानावर माफी मागितली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन आता राजकारण तापलं आहे. भाजपाच्या महिला नेत्यांनी नितीश कुमार यांची गाडी अडवून नारेबाजी केली तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसींनीही नितीश कुमार यांच्या विधानावरुन टीका केली आहे. आता, महिला आयोगाने या विधानाची दखल घेतली.  राष्ट्रीय महिला आयोगाने बिहार विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विधानसभेतील विधानाची तपासणी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोग १९९० च्या कलम १० अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नितीश कुमार यांच्या विधानाचा निषेधही केला आहे.  

काय म्हणाले होते नितीश - 

बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारWomenमहिलाChief Ministerमुख्यमंत्री