शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 5:54 PM

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. 

ठळक मुद्देनरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असणार आहे. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्धव ठाकरे शुक्रवारी संध्याकाळी दाखल झाले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, शिवसेना एनडीएत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही डीजी परिषदेच्या निमित्ताने उभयतांची पुण्यात विमानतळावर भेट झाली होती.

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी औपचारिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनिया गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा होऊ शकते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना