चंदीगढ : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष घेतील. पक्षात दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांना कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही वा कोणताही करार त्यांच्यासोबत झालेला नाही, असे काँग्रेसचे पंजाबचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनी येथे सांगितले. पटियाला येथे पत्रकारांशी बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धूसोबत कोणताही करार झालेला नाही. काँग्रेस असा करार करत नाही. विधानसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर सिद्धू यांना महत्त्वाचे पद देण्यात येणार आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, आपण असे कधीच बोललो नाहीत. सिद्धूंसोबत याबाबत कधी चर्चा झाली नाही. सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत का? असे विचारले असता अमरिंदर सिंग म्हणाले की, मला माहीत नाही. हा काँगे्रस अध्यक्षांचा निर्णय असेल. संपूर्ण मोहीम मी सांभाळत आहे, असेही त्यांनी हसतहसत स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)>बादल विरुद्ध अमरिंदरसिंगअमरिंदर सिंग म्हणाले की, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना आपण लांबी येथून या निवडणुकीत पराभूत करू. बादल कुटुंबाने पंजाबच्या जनतेवर दहा वर्षात जे अत्याचार केले आहेत, त्याबद्दल आपण त्यांना धडा शिकवू, असेही ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी लांबी येथे येऊन बादल यांचा मुकाबला करावा, असे आव्हान त्यांनी दिले.>सांपला शहांना भेटले पंजाब भाजपचे प्रमुख विजय सांपला यांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याचे वृत्त येत असतानाच, मंगळवारी त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. एका जागेवर आपल्या समर्थकाला उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राजीनाम्याचे वृत्त सांपला यांनी फेटाळले असून, पक्षाच्या उमेदवारांच्या यादीला आपले पूर्ण समर्थन असल्याचे म्हटले आहे.
अध्यक्ष म्हणतील तो ‘सीएम’
By admin | Published: January 18, 2017 5:13 AM