योगी आदित्यनाथांनी खरंच शिवी दिली?; 'तो' Video सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 02:27 PM2021-04-05T14:27:36+5:302021-04-05T15:06:26+5:30

Uttar Pradesh CM Yogi Adityanath Viral Video : चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. योगींनी अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

cm yogi adityanath allegedly abuses ani cameraperson former ias surya pratap singh shares video | योगी आदित्यनाथांनी खरंच शिवी दिली?; 'तो' Video सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

योगी आदित्यनाथांनी खरंच शिवी दिली?; 'तो' Video सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर योगींचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत होते. मात्र त्याचदरम्यान काही कारणांवरून चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. योगींनी अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते एएनआयशी बोलत होते. प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरा हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी कॅमरामनला शिवी दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱी सूर्य प्रताप सिंह यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. संताची भाषा ऐका" असं सूर्य प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे.

"उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून एएनआयच्या कॅमेरामनला शिवी देत आहे. असो एएनआयसोबत असंच व्हायला हवं. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे करते तेव्हा असं होणं साहजिक आहे. संताची भाषा ऐका" असं सूर्य प्रताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एएनआयने तो डिलीट करत सुधारित व्हिडीओ पोस्ट केला आहे. "आधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या थेट प्रतिक्रियेचा व्हिडीओ मागे घेण्यात आला आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ कोरोना लसीकरणासंदर्भात माहिती देत आहेत" असं एएनआयने म्हटलं आहे.

मुंबई युवक काँग्रेसनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. "हा आहे अजय बिश्त यांचा खरा चेहरा. एएनआयच्या पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच दिली शिवी. साधूच्या वेशात दिसणाऱ्या या तथाकथित योगींच्या डोक्यात भरलेली अमर्यादा, असंस्कृतता आणि खालच्या पातळीवरील शब्दाबद्दल भाजपाला भलेही अभिमान वाटेल, पण देश अपमानित झाला आहे" असं युवक काँग्रेसने म्हणत टीका केली आहे. तर काहींनी उत्तर प्रदेश पोलिसांना हा व्हिडीओ टॅग करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी छेडछाड करण्यात आलेला व्हिडीओ शेअर करणाऱ्याविरोधात करावाई करावी असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दले आहे. 

Web Title: cm yogi adityanath allegedly abuses ani cameraperson former ias surya pratap singh shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.