शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Yogi Adityanath : 49 हजारांचे कुंडल, 20 हजारांची रुद्राक्ष माळ, रिव्हॉल्व्हर-रायफलही...; जाणून घ्या योगी आदित्यनाथांची संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 4:55 PM

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शुक्रवारी त्यांनी गोरखपूर शहर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी 1.54 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. तसेच, योगी आदित्यनाथ यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 1 लाख रोख रक्कम आहे. यापूर्वी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी आपली संपत्ती 95.98 लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते. 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत जवळपास 60 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्ली, लखनऊ आणि गोरखपूरमधील 6 ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये 11 खाती आहेत. या खात्यांमध्ये 1 कोटी 13 लाख 75 हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे जमीन किंवा घर नाही. परंतु राष्ट्रीय बचत योजना आणि विमा पॉलिसींद्वारे त्यांच्याकडे 37.57 लाख रुपये आहेत.

याचबरोबर, योगी आदित्यनाथ यांच्याकडे 49 हजार रुपयांची सोन्याचे कुंडल आहे. ज्याचे वजन 20 ग्रॅम आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या सोन्याच्या साखळीत रुद्राक्षाची माळ घातली आहे, ज्याची किंमत 20 हजार रुपये आहे. या साखळीचे वजन 10 ग्रॅम आहे. याशिवाय, त्यांच्याकडे 12 हजार रुपयांचा मोबाईलही आहे. दरम्यान, गेल्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे दोन कार आहेत, पण यावेळी त्यांच्याकडे एकही कार नाही. योगी आदित्यनाथ आपल्याजवळ शस्त्रेही ठेवतात. त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किमतीची रायफल आहे.

पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणारयोगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 5 जून 1972 रोजी जन्मलेल्या योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या 26 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती. योगी आदित्यनाथ यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा गोरखपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले. योगी आदित्यनाथ 2017 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२