शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथांनी दिवाळीनिमित्त जनतेला दिलं थेट होळीपर्यंतचं गिफ्ट; केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 7:13 PM

योगी म्हणाले, 31 वर्षांपूर्वी अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. आता पुढच्या वेळी, जेव्हा कारसेवा होईल तेव्हा, भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर गोळ्या नव्हे, तर फुलांचा वर्षाव केला जाईल.

अयोध्या - दीपोत्सवानिमित्त अयोध्येत पोहोचलेल्या सीएम योगींनी (CM yogi) मोठी घोषणा केली आहे. कोरोना काळात सुरू झालेली मोफत रेशन योजना आता होळीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सीएम योगींच्या या निर्णयाचा यूपीतील 15 कोटी जनतेला फायदा होणार आहे. गहू आणि तांदळा व्यतिरिक्त सीएम योगींनी मोफत रेशन योजनेअंतर्गत डाळ, तेल आणि मीठ देण्याचाही निर्णय घेतला आहे. (Yogi Adityanath extended the free ration scheme till holi )

दिवाळीच्या एक दिवस आधी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगी आले होते. ते म्हणाले, कोरोना काळात सुरू करण्यात आलेली PMJKY मोफत रेशन योजना होळीपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 15 कोटी लोकांना दर महिन्याला मिळेल. दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री योगीनी केलेल्या या घोषणेमुळे लोक खूश झाले आहेत.

कोरोना काळात सुरू झालेल्या या रेशन वितरणाअंतर्गत 122 लाख मेट्रिक टन खाद्यान्‍न वाटण्यात आले आहे. यूपी सरकारकडून 2339556.740 मेट्रिक टन, तर पीएमजीकेएवायअंतर्गत 9853889.085 मेट्रिक टन रेशनचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात जवळपास 33705755 रेशन कार्ड धारक आहेत. राज्य सरकारने 80 हजार स्वस्तधान्य दुकानांच्या मदतीने प्रत्येक गरीब आणि निराधार लोकांपर्यंत रेशन पोहोचवले आहे. 

31 वर्षांपूर्वी रामभक्तांवर आणि कार सेवकांवर करण्यात आला होता गोळीबार -दीपोत्सवाच्या कार्यक्रमात सीएम योगींनी पूर्वीच्या सरकारांवरही जोरदार निशाणा साधला. योगी म्हणाले, 31 वर्षांपूर्वी अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. जय श्री रामची घोषणा आणि राम मंदिराच्या समर्थनार्थ आवाज उठविणे गुन्हा मानला जात होता. मात्र, आता पुढच्या वेळी, जेव्हा कारसेवा होईल तेव्हा, भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर गोळ्या नव्हे, तर फुलांचा वर्षाव केला जाईल. राम मंदिराच्या उभारणीबाबत सीएम योगी म्हणाले, 2023 पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशDiwaliदिवाळी 2021BJPभाजपा