शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कोरोना लसीसाठी Co-WIN अ‍ॅपवर करावे लागणार रजिस्टर, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 10:42 AM

Co-WIN : ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस मिळेल, त्यानुसार लसीची तारीख, वेळ व ठिकाण दिले जाईल.

ठळक मुद्देCo-WIN (COVID-19 Vaccine Intelligence Network) हे eVIN (Electronic Vaccine Intelligence Network) चे अपग्रेडेड व्हर्जन आहे.

नवी दिल्ली : शनिवारपासून भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीची ड्राय रन सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड -१९ लसीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना या लसीसाठी नोंदणी करण्यासाठी कोविन (Co-WIN App) नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. देशातील नागरिक जे आरोग्य कर्मचारी नाहीत ते कोविन अ‍ॅपवर लससाठी स्वत: ची नोंदणी करु शकतात, ज्यासाठी त्यांना हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर वरून डाउनलोड करावे लागेल. यामुळे लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्यांनी या अ‍ॅपवर आधीच नोंदणी केली आहे त्यांना लवकरात लवकर लस मिळेल.

CoWIN अ‍ॅप काय आहे?Co-WIN (COVID-19 Vaccine Intelligence Network) हे eVIN (Electronic Vaccine Intelligence Network) चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. ते प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकारला तीन टप्प्यात ही लस मिळेल. यामध्ये पहिल्या टप्प्यातील सर्व फ्रंटलाइन हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि दुसऱ्या टप्प्यात आपत्कालीन सेवांशी संबंधित लोकांना लसीचा डोस मिळेल. देशातील राज्य सरकारांकडून अशा लोकांचा डेटा गोळा करण्यात येत आहे. यानंतर तिसर्‍या टप्प्यात, ज्या लोकांना गंभीर आजारांनी ग्रासले आहे, त्यांना लसी दिली जाईल. यासाठी Co-Win अ‍ॅपद्वारे स्वत: नोंदणी करणे (सेल्फ रजिस्ट्रेशन प्रोसेस) आवश्यक असेल.

COVID-19 लसची सहज ट्रॅकिंग व नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी Co-Win अॅपला पाच मॉड्यूलमध्ये विभागले आहे. ज्यामध्ये पहिले प्रशासकीय मॉड्यूल, दुसरे रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरे लसीकरण मॉड्यूल, चौथे लाभार्थी स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवे रिपोर्ट मॉड्यूलमध्ये विभागले आहे. ज्यांना लस घ्यायची आहे त्यांना नोंदणी मॉड्यूलअंतर्गत माहिती द्यावी लागेल. लसीकरण मॉड्यूलमध्ये त्यांची माहिती तपासली जाईल आणि लाभार्थी स्वीकृती मॉड्यूल त्यांना त्यांच्या लसीबाबत प्रमाणपत्र पाठवेल.

CoWIN अॅपवर लसीसाठी कशी करावी नोंदणी?>> जे नागरिक आरोग्य कर्मचारी नाहीत त्यांना CoWin अ‍ॅपवर नोंदणी मॉड्यूलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येणार आहे. CoWin अॅप गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. दरम्यान, आपल्या माहितीसाठी हे अॅप्लिकेशन अद्याप लाँच झाले नाही.>> Co-WIN वेबसाइटवर स्वत: नोंदणीसाठी 12 फोटो आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स (Voter ID, Aadhar card, driving license, passport आणि Pension document) यापैकी कोणतेही एक  आवश्यक असेल.>> ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस मिळेल, त्यानुसार लसीची तारीख, वेळ व ठिकाण दिले जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञान