नवी दिल्ली : विशेष न्यायालयाने कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाबाबत ४ मार्च रोजी आरोप निश्चित करणार असल्याचे सोमवारी स्पष्ट केले. उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव व अन्य १३ जण यात आरोपी आहेत.सीबीआय आणि आरोपींच्या वकिलांकडून केला जात असलेला युक्तिवाद आणि त्यासंबंधी दस्तऐवजांची पाहणी करण्यासाठी आणखी काही काळ लागेल. त्यामुळे मी आरोप निश्चित करण्यासाठी ४ मार्च ही तारीख निश्चित केली आहे, असे विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पाराशर यांनी सांगितले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी जिंदाल समूहातील कंपन्यांना खाणपट्टे देताना कृपादृष्टी दाखविल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. झारखंडमधील अमरकोंडा आणि मुरगदंगाल कोळसा खाणपट्टे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल), तसेच गगन स्पाँज आयर्न प्रायव्हेट लिमिटेडला वितरित करण्यात आले होते. जिंदाल समूहातील सदर दोन कंपन्यांना खाणपट्टे देताना आरोपींनी परस्परांशी संगनमत केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोळसा; ४ मार्च रोजी आरोपनिश्चिती
By admin | Published: February 02, 2016 2:44 AM