सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांच्या एका विधानाची सध्या चर्चा होत आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी स्टोव्हमध्ये कोळसा घालून चहा बनवण्याबाबत बोलताना दिसत आहेत. आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये असताना मोठ्या प्रमामावर वावविवाद झाला होता. त्याचदरम्या, राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानामुळे ते ट्रोल झाले आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिलंय की, स्टोव्हवर कोळसा? तुमच्या बटाट्यापासून सोनं तयार करण्याच्या कल्पनेतून आम्ही सावरतच होतो तेवढ्यात तुम्ही स्टोव्हमध्ये कोळसा टाकून आम्हाला गोंधळात टाकलंय. तुम्ही शुद्धीत तरी आहात का? असा सवाल हिमंत बिस्वा सरमा यांना व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका सभेला संबोधित करताना दिसत आहेत. त्यात ते म्हणाले की,’’ सकाळी उठता. चहा गरम करण्यासाठी स्टोव्हमध्ये कोळसा घालता. तो पेटवता’’, राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधींच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. अनेक युझर्सकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. तर काही युझर्स त्यांचं समर्थन करत आहेत. काही स्टोव्ह कोळशाचा वापर करून पेटवला जातो, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, राहुल गांधींचं समर्थन करणाऱ्या काही युझर्सनी हिमंता बिस्वा सरमांवर टीका केली आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात की ट्रोल असा सवाल त्यांनी विचारला आहे.